कोल्हापूर : जि. प. भरतीसाठी 7 ऑक्टोबरपासून परीक्षा | पुढारी

कोल्हापूर : जि. प. भरतीसाठी 7 ऑक्टोबरपासून परीक्षा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरतीसाठी पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा परिषदांना पाठविले असून त्यानुसार 7 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहेत. तीन सत्रांत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र https:/// www. zpkolhapur. gov. in/ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांना सूचना

1. प्रवेशपत्राचे दोन्ही भाग डाऊनलोड करून त्यावर आपला अलीकडचा फोटो चिकटवून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या दिवशी आणावा.

2. सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, चालू वर्षाचे महाविद्यालयीन ओळखपत्र यासारखे ओळखपत्र आणावे. झेरॉक्स आणल्यास प्रवेश नाकारण्यात येईल.

3. रेशन कार्ड किंवा वाहन चालक शिकाऊ परवाना ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही.

4. परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी (रिपोर्टिंग टाईम) तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.

5. परीक्षा केंद्रावर उमेदवारांची झडती घेण्यात येणार असल्याने उमेदवाराने बूट व मोजे टाळावे. पेनड्राईव्ह, ब्लूटुथ, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, स्मार्ट वॉच आणि इतर बंदी घातलेल्या प्रतिबंधित वस्तूंना परवानगी नाही.

6. इअर बड, हेडफोन परीक्षार्थीकडे सापडल्यास उमेदवारावर फौजदारी होणार.

7. ऑनलाईन परीक्षा असल्याने प्रत्येक उमेदवारांना त्यांचा स्वतंत्र पासवर्ड उपलब्ध होणार आहे. प्रत्येक केंद्रावर डोंगलद्वारे सर्व्हर कार्यान्वित होऊन सर्व संगणकांना लॅनद्वारे कनेक्ट केले आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. मागणी केलेल्या दिव्यांगांनाच लेखनिक पुरविला जाईल.

परीक्षेचे वेळापत्रक

दि. 7 ऑक्टोबर
रोडरोलर चालक व वरिष्ठ सहायक लेखा

दि. 8 ऑक्टोबर
विस्तार अधिकारी, सांख्यिकी

दि.10 ऑक्टोबर
विस्तार अधिकारी, कृषी

दि.11 ऑक्टोबर
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), लघुलेखक (वरिष्ठ श्रेणी) व कनिष्ठ सहायक लेखा.

Back to top button