Pune Bank news : महेश बँकेकडून 10 टक्के लाभांश जाहीर | पुढारी

Pune Bank news : महेश बँकेकडून 10 टक्के लाभांश जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महेश सहकारी बँक लिमिटेडने 1233 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून, 6.41 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बँकेने आपल्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे. बँकेची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पुण्यात झाली. बँकेने आपल्या कामगिरीचा आढावा घेतला. बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम असून, ऑडिट वर्ग ‘अ’ श्रेणी संपादन केली आहे. तसेच, निव्वळ अनुत्पादित खात्यांचे प्रमाण (एनपीए) शून्यावर आणले आहे.

बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) 23.08 टक्के असून, रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन’ अशा वर्गवारीत बँक गणली जाते. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने या वर्षी सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे. व्यवसायवाढीसाठी दोन शाखा उघडण्याचा मानस बँकेचे अध्यक्ष जुगलकिशोर पुंगलिया यांनी व्यक्त केला.

बँकेचे कार्यक्षेत्र ‘संपूर्ण महाराष्ट्र’ राज्य असून, एकूण 15 शाखा आहेत. तसेच नेट बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय अशा आधुनिक डिजिटल सेवांसह इतर सर्व सेवा उपलब्ध आहेत. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हिरालालजी मालू, विठ्ठल मणियार या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष गोपाळ राठी यांनी आभार मानले.

हेही वाचा

Pune PMPML News : संचलन तूट कमी करण्यासाठी इतर पर्याय शोधा

बाटल्यांपासून बनवले तरंगते बेट!

अपात्रतेची सुनावणी

Back to top button