कर्जत : पुढारी वृत्तसेवा : विकासकामे खूप केली. मात्र, गणेश स्थापना करून किंवा मंडळ स्थापन करूनही देखावे करता आले नाहीत, असा टोला आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. शहरातील एका कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी आमदार शिंदे म्हणाले, कर्जत -जामखेड मतदारसंघात आपण अनेक विकासकामे केली.शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविला. एवढेच नव्हे तर ग्रामीण रस्त्यांचे जाळी निर्माण केले. कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. कुकडीचे पाणी शेतकर्यांना मिळवून दिले. मात्र, हे सर्व करताना मला गणेश मंडळ तयार करता आले नाही. गणपती बसवता आला नाही आणि विकास कामांचा देखावाही करता नाही आला. इथे मात्र काही न करता देखावे करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी आमदार पवार यांन उद्देशून केली.
एमआयडीसी देखावा नाही आणून दाखवू
आमदार शिंदे म्हणाले, एमआयडीसीचा देखावा केला आहे, त्यांची एमआयडीसी कशी आहे, कोणासाठी करण्यात येत आहे, हे सर्वांना माहीत आहे. मी मात्र एमआयडीसीचा देखावा करणार नाही, तर प्रत्यक्षात एमआयडीसी आणूनच दाखविणार. कारण काम करण्यावरच माझा विश्वास आहे.
आमदार शिंदे म्हणाले, अमरापूर-बारामती रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मी मागच्या दाराने आमदार झालो. त्यामुळे कर्जत शहरातील रस्त्याचे काम होताना एकही दुकान निघाले नाही, अन्यथा या मेन रोडवरील अनेक व्यावसायिकांची दुकाने काढण्यात आली असती. त्यामुळे माझ्या आमदार असण्याचा फायदा व्यावसायिक, राजकारणी या सर्वांनाच होत आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.
हेही वाचा :