Pune News : वैधमापनशास्त्र विभागास मिळेना पूर्णवेळ सहनियंत्रक | पुढारी

Pune News : वैधमापनशास्त्र विभागास मिळेना पूर्णवेळ सहनियंत्रक

शिवाजी शिंदे

पुणे : अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या वैधमापनशास्त्राच्या पुणे विभागाला अजूनही पूर्णवेळ ’सहनियंत्रक’ मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. सध्या असलेले सहनियंत्रक यांच्याकडे पुण्याचा प्रभारी पदभार आहे. त्यामुळे या विभागातील अधिकार्‍यांचा अंधाधुंद कारभार सुरू असून, त्यांच्या या कारभाराकडे कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे. या विभागास लवकरात लवकर पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही, तर या विभागातील निरीक्षकांचे ’हम करे सो कायदा’ असे चित्र दिसून येत आहे.

राज्यात वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्क आणि राज्य उत्पादन शुल्कानंतर अन्न आणि पुरवठा विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या वैधमानशास्त्र या विभागाकडून दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळत असतो. राज्यात पुणे विभागाकडून सर्वाधिक महसूल राज्य शासनाला मिळत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या विभागास पूर्णवेळ सहनियंत्रक या क्लास वन पदावर अधिकारीच नव्हता.

अनेक महिने हे पद रिक्त होते. दरम्यान, मागील महिन्यात सहनियंत्रक या पदावर ललित हरोडे यांची शासनाने नियुक्ती केली होती. त्यांनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यांच्याच खात्यातील एका निरीक्षकाकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर हे पद पुन्हा रिक्त झाले होते. दरम्यान, या पदाचा तात्पुरता पदभार छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले सहनियंत्रक यांच्याकडे आहे. असे असले तरी पुणे विभागाकडे त्यांचे लक्ष कमी असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा

ठाणे : गतिमंद मुलीची पित्याकडूनच हत्या; मानपाडा हादरले

Chandrasekhar Bawankule : निवडणुका जिंकण्यासाठी गुजरात पॅटर्न राबवा : बावनकुळे

Monsoon withdrawal: ५ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून माघारी फिरणार

Back to top button