Pune News : कॉसमॉसमध्ये मुंबईतील साहेबराव देशमुख सहकारी बँकेचे विलीनीकरण; रिझर्व्ह बँकेकडून मान्यता

Pune News : कॉसमॉसमध्ये मुंबईतील साहेबराव देशमुख सहकारी बँकेचे विलीनीकरण; रिझर्व्ह बँकेकडून मान्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे येथील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये सह स्वैच्छिक विलीनीकरणास रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सोमवारी (दि.२६) मान्यता दिली आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलमाअंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आरबीआयने विलीनीकरण मंजूर केले आहे.

त्यामुळे साहेबराव देशमुख सहकारी बँक लि. मुंबई ही आता 26 सप्टेंबरपासून दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या शाखा म्हणून काम करतील, अशी माहिती आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाळ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये जाहीर केली आहे. कॉसमॉस बँकेने आजवर १८ सहकारी बँकांचे विलिनीकरण यशस्वीपणे केलेले आहे. सहकार क्षेत्र आणि सहकारी बँकांसाठी कॉसमॉसने नेहमीच मदतीची भावना ठेवत बँकांमधील ग्राहक, खातेदार, ठेवीदारांना दिलासा देण्यास प्राधान्य दिले असल्याची माहिती कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news