

पुणे : राज्यातील बहुतांश भागांत शुक्रवार आणि शनिवारी हलका ते मध्यम पाऊस पडेल; तर विदर्भात शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. झारखंडमध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हिमालयापासून ते उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात ते मध्य प्रदेशसह देशाच्या 90 टक्के भागात यलो अलर्ट दिला आहे.
मध्य प्रदेश बिहार, छत्तीसगड, झारखंड व विदर्भला शनिवारी ऑरेज अलर्ट दिला. शुक्रवारी विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज आहे. मात्र उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शनिवारपासून राज्यातील पाऊस कमी होऊन रविवारी पावसाचा जोर पूर्णत: ओसरणार आहे.
हेही वाचा