Maharashtra Rain Update : राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस | पुढारी

Maharashtra Rain Update : राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

पुणे : राज्यात दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. पुढील पाच दिवस पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. मात्र, कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील उत्तर पूर्व भागापासून ते पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. तसेच चक्रीय स्थितीदेखील या भागात कार्यरत आहे. सध्या या दोन्ही स्थितींचा प्रभाव कायम आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत या दोन्ही स्थिती झारखंड पार करून पुढे सरकणार आहेत.

हेही वाचा

बसचा प्रवास झाला धोकादायक ; टायर पंक्चर, बिघाडामुळे रात्री-अपरात्री बस पडताहेत बंद

सांगली : केवळ 57 गावांत ‘एक गणपती’!

मनोज जरांगे पाटलांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता पुन्हा साखळी उपोषण करणार

Back to top button