खेडला अजित पवारांना शह देण्यासाठी नेतेमंडळी मैदानात

खेडला अजित पवारांना शह देण्यासाठी नेतेमंडळी मैदानात
Published on
Updated on

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  खेड तालुक्यात एकतर्फी वाटत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी खेड तालुक्यातील दोन माजी आमदार गटांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उघड समर्थन दिले आहे. माजी आमदार दिवंगत साहेबराव सातकर आणि माजी आमदार दिवंगत साहेबराव बुट्टे पाटील यांचे गट शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. साहेबराव सातकर यांचे चिरंजीव राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष व तालुक्यात विविध पदे भूषविणारे हिरामण सातकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

खासदार शरद पवार यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 18) पुणे येथे नियुक्तिपत्र देण्यात आले. साहेबराव बुट्टे पाटील यांचे चिरंजीव तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर हे दिग्गज नेते या वेळी उपस्थित होते. या बदलाने खेड तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण अस्तित्वात येणार आहे. एका अर्थाने या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पर्याय उभा राहणार असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर खेड तालुक्यातील सर्व नेते, कार्यकर्ते अजित पवार गटाशी जुळलेले होते. तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व जण अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे संकेत मिळत होते. तथापि, तालुक्यात मोठी राजकीय ताकद असलेले तालुक्याचे माजी आमदार, सहकारमहर्षी साहेबराव सातकर आणि माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील या दिवंगतांच्या गटाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याविरोधातही शरद पवारांच्या आदेशाला मानणारे हे नेते आहेत. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याविरोधात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा या नेत्यांना छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. आता वळसे पाटील अजित पवार गटात असल्याने या नेत्यांना थेट शरद पवारांच्या माध्यमातून तालुक्यात राजकीय बांधिलकी जोपासावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन तगडे मतप्रवाह निर्माण झाल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण होणार आहे. चासकमान, भामा आसखेड व कळमोडी धरणे, नदीवरील बंधारे, कालवे तसेच चाकण एमआयडीसीच्या माध्यमातून तालुक्यात शरद पवार यांनी मोठी व धोरणात्मक कामे केली आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news