Pune News : ‘ऊस निर्यात बंदीच्या निर्णयास स्थगिती देणार’ | पुढारी

Pune News : ‘ऊस निर्यात बंदीच्या निर्णयास स्थगिती देणार’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने 30 एप्रिल 2024 पर्यंत परराज्यात ऊस निर्यातीस बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयास स्थगिती देण्यात येईल आणि तसे आदेश मंगळवारी (दि.19) काढण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सोमवारी (दि.19) दिले.

येथील सर्किट हाऊसवर वळसे पाटील यांची खोत यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन ऊस झोनबंदीच्या चुकीचा निर्णय मागे घेण्यासाठी निवेदन देत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांशीही चर्चा करण्यात आल्याची माहिती खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिष्टमंडळात रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, रयतचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, राज्याच्या ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील, सचिन नलावडे तसेच अनिल पाटील, सयाजी मोरे आदी उपस्थित होते. आश्वासनानुसार आदेश न निघाल्यास रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.

हेही वाचा

Asia Cup 2023 : आशिया चषक जिंकल्यानंतर भारताला मिळाले सव्वा कोटी रुपये

Pune crime news : महावितरणचे कर्मचारी सांगून फसवणारी टोळी पकडली

प्रशिक्षकांच्या सूचनेनुसारच सिराजची गोलंदाजी थांबवली : रोहित शर्मा

Back to top button