Pune Accident News : दिवेघाटात १४ कामगार घेऊन जाणारा टेम्पो पलटी; तिघांची प्रकृती गंभीर | पुढारी

Pune Accident News : दिवेघाटात १४ कामगार घेऊन जाणारा टेम्पो पलटी; तिघांची प्रकृती गंभीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सासवडच्या दिशेने हडपसरला निघालेला कामगार वाहतूक करणारा टेम्पो दिवे घाटात पलटी झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी नऊ वाजता घडला. यामध्ये टेम्पोतील 14 कामगार जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना तात्काळ नागरिकांनी सासवड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेकराईनगर येथे बांधकामाचे काम सुरू असल्याने सासवडच्या दिशेने हा टेम्पो बेकराई नगरकडे निघाला होता. या टेम्पोमध्ये कामगाराबरोबरच बांधकामाचे साहित्य देखील भरलेले होते. दिवेघाटातून हडपसरच्या दिशेने निघालेल्या टेम्पो घाटाच्या दुसऱ्या वळणावर वळत असतानाच अचानक पलटी झाला.

यामध्ये टेम्पो मधील सेंट्रींगचे सामान कामगारांच्या अंगावर पडल्याने कामगार जखमी झाले. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ या कामगारांना बाहेर काढत त्यांना सासवड येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अग्निशमन दल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या कामगारांपैकी तीन कामगार गंभीर जखमी झाले असून इतर कामगारांना किरकोळ मार लागला आहे. कामगारांवर सध्या सासवडच्या रुग्णाला उपचार सुरू आहे.

हेही वाचा

पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचं लोकार्पण

पिंपरी : स्वच्छ शहरासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त पुण्यात जड वाहनांना बंदी

Back to top button