Libya flood: लिबीयात डॅनियल वादळानंतर महापूराचे तांडव; मृतांचा आकडा ११ हजारांवर | पुढारी

Libya flood: लिबीयात डॅनियल वादळानंतर महापूराचे तांडव; मृतांचा आकडा ११ हजारांवर

पुढारी ऑनलाईन: डॅनियल चक्रीवादळाचा लिबियाला मोठा फटका बसला आहे. हे वादळ धडकल्यानंतर येथील काही शहरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. महापूरासारख्या नैसर्गिक आपत्तीने तांडव घातल्याने यामध्ये आत्तापर्यंत ११ हजार ३०० लिबियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे, असे वृत्त ‘AP’ या न्यूज एजन्सीने दिले आहे. (Libya flood)

एपी (AP) ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, लिबियातील किनारी शहर डेर्ना येथील मृतांचा आकडा 11,300 वर पोहोचला आहे. येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन धरणे फुटली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे. तसेच लिबियाच्या भूमध्यसागरीय शहरातील जवळपास 10,100 लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे, असेही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मेरी एल-ड्रेसे यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ ला दिलेल्या माहितीत सांगितले. (Libya flood)

Libya flood: लिबियात नेमकं काय झाले?

डॅनियल या अतितीव्र वादळ पूर्व लिबियाच्या किनाऱ्यावर जोरदार धडकले. यामुळे या भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि याचा सर्वात अधिक फटका हा लिबियातील डेर्ना या शहराला बसला. मुसळधार पावसातील येथील दोन धरणे देखील फुटली त्यामुळे येथील घरी कोसळून आख्या लोक वस्त्याही पाण्याबरोबर वाहून गेल्या. १ लाख लोकसंख्येच्या या शहरात या पुराच्या पाण्याने अक्षरश: मृत्यूचे तांडव केले. शेकडो घरे पडली, वाहने वाहून गेली. या पुराच्या तडाख्यात आत्तापर्यंत ११ हजारांवर लोक मृत्यूमुखी पडले असून, १० हजार हून अधिकजण बेपत्ता झाले आहेत.

हेही वाचा:

 

Back to top button