Dabholkar murder case : डॉ. दाभोलकर खून प्रकरणात सरकारी साक्षी पुरावे संपले

Dabholkar murder case : डॉ. दाभोलकर खून प्रकरणात सरकारी साक्षी पुरावे संपले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात नरेंद्र दाभोलकर खटल्यातील साक्षी पुरावे संपल्याबाबतचा अर्ज दाखल केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 मध्ये गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात पुणे पोलिस, एटीएसनंतर तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

दरम्यान याप्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणात सीबीआयने मुख्य आरोपपत्रासह पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी पुरावे संपल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून दिली. आता याप्रकरणात आरोपींचे जबाब नोंदविले जाणार असून, त्यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील. याप्रकरणाची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news