पुणे जिल्ह्यात बैल पोळ्याला मिरवणूक काढायची का? शेतकर्‍यांमध्ये संभ्रम | पुढारी

पुणे जिल्ह्यात बैल पोळ्याला मिरवणूक काढायची का? शेतकर्‍यांमध्ये संभ्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यापूर्वीच घोषित केला आहे. मात्र, बैल पोळ्यानिमित्त मिरवणुका काढाव्या की नाही? यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कोणत्यातही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बैलांची मिरवणूक काढावी की नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे.

जिल्ह्यातील शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली व मुळशी तालुक्यांतील काही गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले. जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख जनावरे असून, त्यातील दीड हजार जनावरांना लम्पीची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
गोवर्गीय प्राण्यांच्या शर्यती, जत्रा भरवणे, प्रदर्शन या ठिकाणी सहभागी होणारी सर्व गोवर्गीय प्रजातीच्या जनावरांचे किमान 28 दिवसांपूर्वी लम्पीसाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकार्‍याचा आरोग्य दाखला आयोजकास सादर करणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, बैल पौळ्यानिमित्त निघणार्‍या बैलांच्या मिरवणुकीसंदर्भात कोणत्याच स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संभ—माचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे चौकशी करा’

बैल पोळ्यानिमित्त मिरवणुकीसंदर्भात काही सूचना दिल्या आहेत का? अशी विचारणा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे चौकशी करा, असे सांगितले.

हेही वाचा

कोल्हापूर : अकिवाटच्या शेतकर्‍यानेच केले अडीच एकरांतील टोमॅटो उद्ध्वस्त

इचलकरंजीत ‘झिका’, तर केरळमध्ये ‘निपाह’ माजवतोय दहशत!

Pune Water : पुण्यावर घोंघावतेय पाणी संकट; खडकवासला धरणातील साठ्यात वेगाने घट

Back to top button