पिंपरी : बक्षिसाचा नुसताच ‘जल्लोष’; 50 लाख मिळाले, पण वापरायचे कसे?

शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान
शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे जानेवारी 2023 मध्ये आयोजित जल्लोष शिक्षणाचा स्पर्धेत मॉडेल शाळा ठरविलेल्या मनपाच्या आठ शाळांना पैकी एका सर्वोत्कृष्ट शाळेस 1 कोटी रुपये आणि इतर सात शाळांना 50 लाखांचे बक्षीस देण्यात आले. ही रक्कम शाळेच्या विकासावर खर्च करण्याचे अधिकार शाळांना देण्यात आले आहेत. मात्र, काही शाळांची परिस्थिती अशी आहे की, बक्षीस मिळाले खरे, पण वापरच करता येत नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नावीन्यपूर्ण विचार वाढीकरिता विद्यार्थी व शालेय स्तरावर जल्लोष शिक्षणाचा स्पर्धेचे आयोजन 24 व 25 जानेवारी या कालावधीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुमारे 129 शाळा आहेत. मनपाच्या या शाळा 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या एका शाळेची निवड मॉडेल शाळा म्हणून करण्यात आली.

प्रत्येक झोनमधून महापालिकेची प्रत्येकी एक शाळा याप्रमाणे एकूण 8 शाळा मॉडेल शाळा ठरविल्या. यापैकी सर्वोत्कृष्ट शाळेस 1 कोटी रुपये आणि इतर सात शाळांना 50 लाखांचे बक्षीस देण्यात आले. मिळणार्‍या बक्षीस रकमेतून 25 टक्के रक्कम शाळेच्या विकासावर खर्च करण्याचा शाळांना अधिकार दिले जातील. उर्वरित 75 टक्के रक्कम शाळेस मॉडेल स्कूल बनविण्याकरिता खर्च केली जाणार आहे. शिक्षण विभागाने या विजेत्या शाळांकडून कोणत्या सुविधांवर खर्च करणे अपेक्षित आहे. याची यादीदेखील मागवून घेतली आहे. मात्र, अजूनही शाळांच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्यात आले नाहीत.

मॉडेल स्कूल बनविण्यासाठी खर्च

मिळणार्‍या बक्षीस रकमेतून 25 टक्के रक्कम शाळेच्या विकासावर खर्च करण्याचा शाळांना अधिकार दिले जातील. उर्वरित 75 टक्के रक्कम शाळेस मॉडेल स्कूल बनविण्याकरिता खर्च केली जाणार आहे.

बक्षिसातून अत्यावश्यक खर्च राहिला बाजूलाच

बक्षिसांची रक्कमेतून शाळांना त्यांची अत्यावश्यक गरज पूर्ण करायची आहे. मात्र, जागेचा आभाव, जुनी इमारत यामुळे बक्षिसाच्या रकमेतून अत्यावश्यक खर्च बाजूलाच राहणार आहे.

या आहेत शाळांमधील समस्या

1 सोनावणे वस्ती शाळांमध्ये वर्गखोल्या कमी आहेत. मिळालेल्या बक्षिसामधून वर्गखोल्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, ही शाळा रेडझोनमध्ये असल्याने याठिकाणी कोणतेच नवीन बांधकाम करता येत नाही.
2 फकिरभाई पानसरे शाळेच्या विद्यार्थ्यांना थेट बस नाही. त्यामुळे शाळेस बसची आवश्यकता आहे. मात्र, बसचा देखभाल दुरुस्तीखर्च पुन्हा वाढेल म्हणून बसची मागणी मनपा अधिकार्‍यांकडून फेटाळली आहे.
3 हुतात्मा चापेकर शाळेची इमारत जुनी झाली आहे. शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी शौचालये अपुरी आहेत. बक्षिसाची रक्कम यासाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र, अजूनही कोणतीही उपाय योजना झालेली नाही.
4 वैष्णोमाता प्राथमिक शाळेस 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ही शाळा अर्धी पक्क्या इमारतीमध्ये तर अधी शाळा पत्राशेडमध्ये भरते, शाळेस मैदानही नाही. विद्यार्थ्यांना दाटीवाटीमध्ये शिक्षण घ्यावे लागते. अशावेळी बक्षिसाच्या रकमेतून पत्राशेड उपलब्ध करून दिले जाणार आहे; पण शाळेस जागा नाही.
5 तसेच यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा, थेरगाव, संत तुकारामनगर शाळा, पिंपरी, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्र. 54 मध्ये शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि काही भौतिक
सुविधांची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही.

या आहेत बक्षीस मिळालेल्या शाळा

वैष्णवमाता प्राथमिक शाळा इंद्रायणीनगर या शाळेस 1 कोटीचे बक्षीस मिळाले आहे.

  • 50 लाखांचे बक्षीस मिळालेल्या शाळा
  • फकीरभाई पानसरे उर्दू शाळा, चिंचवड
  • हुतात्मा चापेकर शाळा, चिंचवडगाव
  • पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्र 54
  • काळजेवाडी प्राथमिक शाळा, चर्‍होली
  • सोनावणे वस्ती प्राथमिक शाळा
  • यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा, थेरगाव
  • संत तुकारामनगर शाळा, पिंपरी,

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news