Pune-Mumbai highway accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू | पुढारी

Pune-Mumbai highway accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भालचंद्र अहिरकर (वय ३५), अर्जुन शेळके (वय ४०) असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दोघेही पिंपरी- चिंचवडमधील निगडी येथील रहिवाशी आहेत. हा अपघात सोमाटणे फाटा येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडला आहे. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथून आहिरकर आणि शेळके दुचाकीवरून जात होते. दरम्यान भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा

पाथर्डीत आडसूळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; एसटी कष्टकरी जनसंघाचे आंदोलन

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

अहमदनगर जिल्ह्यात लम्पी आटोक्यात

 

Back to top button