Pune Crime : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करणार्‍या एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पीडित महिलेने मारहाणीची तक्रार दाखल केल्याच्या रागातून जातिवाचक शिव्या दिल्याने अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन यशवंत शिंदे (वय 43, रा. एनडीए रोड, शिवणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना 8 मे 2023 आणि 20 जून 2023 रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. आरोपी सचिन शिंदेने पीडित महिलेला वारजे येथे नेऊन पिण्यासाठी कोल्ड्रिंक दिले. यानंतर महिलेला गरगरल्यासारखे झाले. त्या वेळी आरोपीने संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवून त्याचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. तसेच पीडित महिला या दुचाकी चालवायला शिकत असताना शिवीगाळ केली होती. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news