पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर शहरास मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून खंडोजी महाराज यात्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला गेला पाहिजे. कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना आपल्या बळाचा वापर करण्याची गरज भासणार नाही अशाच प्रकारची यात्रा संपन्न होईल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आगामी काळात शहरात शांतता अबाधीत राखून प्रेम, भाईचारा अधिकाधिक वृध्दींगत व्हावा, यासाठी पिंपळनेरकरांनी आपल्या मनातील संवेदनशील गुणांचा प्रत्यय द्यावा असे आवाहन शांतता कमेटीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी केले. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनी श्रीकृष्ण पारधी यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
गणेशोत्सव व खंडोजी महाराजांच्या 195 व्या नामसप्ताह यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वधर्मीय तसेच पक्ष, संघटना, सामाजिक कार्यर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामाजिक एकोप्यासाठी पोलीस प्रशासनास गावातील लोकांनी सहकार्यासह त्यात प्रत्यक्ष सहभागी होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या व यात्रेच्या कालावधीत अतिरिक्त पोलीस, होमगार्ड दल तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
खासदार बापूसाहेब चौरे यांनी वाहतूक व्यवस्था सक्षम करुन प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपआपली जबाबदारी पार पाडावी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वैफल्य संदेश पोहचणार नाहीत अशी दक्षता युवकांनी घ्यावी अशी माहिती दिली.
धनराज जैन, पांडुरंग सूर्यवंशी, देवेंद्र गांगुर्डे, विशाल बेनुस्कर, डॉ.राजेंद्र पगारे, राजेंद्र गवळी, प्रमोद गांगुर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले.
शहरात यात्रेच्या काळात येणाऱ्या प्रमुख अडचणी जसे भारनियमन, सुरक्षा व्यवस्था, मोकाट जनावरे, वेळेचे बंधन, वाहतूक व्यवस्था, ध्वनीच्या आवाजाची तीव्रता इत्यादी विषयांवर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शांतता कमिटीच्या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, योगेश्वर महाराज देशपांडे, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पाऊस आय.भाईदास माळचे ,मा.खासदार बापूसाहेब चौरे, विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे, नायब तहसीलदार बि.जे.बहिरम, वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश मोहने, विज वितरणचे इंजी.चेतन ठाकरे, ए.एस.आय.लक्ष्मन गवळी, सरपंच देविदास सोनवणे, उपसरपंच विजय गांगुडे, मा.सभापती संजय ठाकरे, जैन समाजाचे धनराजशेठ जैन, पं.स.सदश्य देवेंद्र गांगुर्डे, पांडुरंग सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे, सुरेंद्र मराठे, ऍड.ज्ञानेश्वर एखंडे, ए.बी.मराठे,योगेश बधाण, नासिर सैय्यद, सतिश पाटील, महेश गांगुर्डे, जगदीश ओझरकर, पी.एस.पाटील, वसंत कोतकर, योगेश नेरकर, देवेंद्र कोठावदे, रिखबशेठ जैन, डॉ.पंकज चोरडिया, अविनाश पाटील, युवानेते प्रविण चौरे, निलेश कोठावदे, सौरभ बेनुस्कर, चंदन सूर्यवंशी, अमोल पाटील, दत्तू पवार, अल्ताफ आरके, चंदन सूर्यवंशी, नौशाद सैय्यद, सुनील लोखंडे, स्वामी खरोटे, रवी मालुसरे, टिणू वाघ, लियाकत सैय्यद, जाकीर शेख, नितीन कोतकर, संदिप शिंदे, टीणू नगरकर, कुस्ती समितीचे सदस्य विविध सामाजिक संघटनांचे सदस्य,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कोतवाल,महिला,पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक प्रयत्न करित आहेत. शांतता कमिटीच्या सदस्यांनी सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक गणेश मंडळाने ड्रेस कोडचा अवलंब करावा. पिंपळनेर गाव अतिशय शांतता प्रिय असून गावाचे कौतुकही केले. यात्रोत्सव काळात सर्वधर्मीय एकोपा साधला जात असून शहरातील जामा मशिदी समोर मध्यरात्री 22 सप्टेंबर रोजी खंडोजी महाराजांच्या पालखीचे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य स्वागत केले जाते.
ृ