गारगोटी : पुढारी वृत्तसेवा सकल मराठा समाजाच्यावतीने आज गारगोटी शहर बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालये, वैद्यकीय सेवा वगळता गारगोटी शहरातील दुकाने, टप-या, व्यवसाय बंद ठेवून कडकडीत नागरिकांकडून बंद पाळण्यात आला.
यावेळी बोलताना माजी उपसरपंच जयवंत गोरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मच्छिंद्र मूगडे म्हणाले, मराठा समाजाने आजपर्यंत शांततेत आंदोलन केली आहेत. यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका पोहोचल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन हाती घेईल असे मत बजरंग पांडुरंग देसाई, विजय कोटकर यांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलकांनी गारगोटी शहरातून निषेध रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी नंदकुमार शिंदे, काँ. सम्राट मोरे, शिवराज देसाई, शरद मोरे, प्रा. सुनील मांगले, भुजंगराव मगदूम, संदीप पाटील, आनंदा देसाई (म्हसवे), संभाजी ब्रिगेडचे मानसिंग देसाई, स्वप्निल साळोखे, संजय भारमल, सुधीर हिरेमठ आदी उपस्थित होते. दरम्यान यापुढे हुतात्मा क्रांती चौकात बुधवार पासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
हेही वाचा :