माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी चार प्रबळ इच्छुक

माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी चार प्रबळ इच्छुक
Published on
Updated on

शिवनगर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिल्याने आता त्या पदावर निवडीसाठी चार संचालक प्रबळ इच्छुक आहेत. अ‍ॅड. केशवराव जगताप, मदननाना देवकाते, सुरेश खलाटे, योगेश जगताप आदी प्रबळ दावेदार असल्याचे मानले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अध्यक्ष ठरविणार असल्याने त्यांची मर्जी कोणावर बहाल होईल, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

माळेगाव कारखान्याचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत चर्चेला उधाण आले आहे, तर राज्यात सहकारातील अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या या साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड रस्सीखेच आहे. आगामी दोन वर्षे कारखान्यासह इतरही निवडणुकांचे वर्ष असल्याने तसेच राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या राजकारणात कोण उपयुक्त ठरेल, त्यानुसार निर्णय होण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. केशवराव जगताप यांना सहकारातील 45 वर्षांचा दांडगा अभ्यास असून, सिद्धेश्वर सहकार संकुलाच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था त्यांनी प्रगतिपथावर नेल्या आहेत.

माळेगाव साखर कारखान्याच्या माध्यमातूनदेखील बारा ते पंधरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मदननाना देवकाते यांना माळेगाव साखर कारखान्याचे संचालक ते उपाध्यक्ष, असा 23 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा बँक आदी संस्थांवर त्यांनी आपल्या कामकाजाचा ठसा उमटविला आहे. निरावागज गावचे सरपंचपद तसेच सोसायटीचे अध्यक्षपद आदी प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. सुरेश खराटे तथा लाला मामा यांनादेखील कारखाना संचालकपदाचा तेरा ते चौदा वर्षांचा अनुभव असून, गावपातळीवरील विकास सोसायटीच्या माध्यमातून आपल्या कामाचा त्यांनी ठसा निर्माण केला आहे. जनसामान्यांतील माणूस 'आपला माणूस' अशी त्यांची स्वतःची वेगळी प्रतिमा आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे.

योगेश जगताप यांची युवकांमधील असलेली 'क्रेझ' तसेच बारामती नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा अनुभव, दहीहंडी संघ ते वेगवेगळे सामाजिक उपक्रम या माध्यमांतून त्यांची असलेली वेगळी ओळख एक मोठा संघटक म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

अजित पवारांचे धक्कातंत्र
सध्यातरी या चार नावांची चर्चा अध्यक्षपदाच्या दावेदारीसाठी असल्याचे बोलले जाते. तथापि, अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेणार असून, कोणत्या धक्कातंत्राचा ते अवलंब करतील का? याबाबत ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे. पवार हे आपल्या वेगळ्या कार्यशैलीने ओळखले जातात. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार घेऊन भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्या धर्तीवर राजकारणातील गोळाबेरीज करता कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत एखादा वेगळाच निर्णय होईल का? या शक्यतेवरहीअंदाज जानकार बोट ठेवत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news