Latest
Pune Crime news : पुणं पुन्हा हादरलं; आईच ठरली वैरी! पोटच्या मुलीचा केला खून; दोन बहिणींच्या वादात एकीचा घेतला जीव
दौंड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात दोन बहिणींच्या घरातील भांडणांवरून आईने रागाच्या भरात स्वतःच्याच मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सरिता हरिओम जाडींग यांच्या दोन मुलींचे घरात भांडण सुरू होते, ते सोडवण्यास सरिता गेल्या होत्या, परंतु मुलींनी आईला देखील धक्काबुक्की केली.
त्यामुळे आईने रागाच्या भरात स्वतःच्या पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला अशा आशयाची फिर्याद सरिताचे पती आणि मुलींचे वडील हरीओम जाडीगं (रा, डिफेन्स कॉलनी रेल्वे क्वार्टर दौंड) यांनी पोलीस स्टेशनला केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करत आहेत.
हेही वाचा

