शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंडमध्ये फसवणूक | पुढारी

शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंडमध्ये फसवणूक

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्रापूर येथील युवक केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड येथे गेले असताना त्यांनी बुकिंग केलेल्या हॉटेलमधून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या युवकांनी उत्तराखंड पोलिसांशी संपर्क साधला असता, या युवकांना उत्तराखंड पोलिसांकडून तातडीने मदतीचा हात मिळून त्यांची फसवणूक झालेली रक्कमदेखील परत मिळाली. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सूरज खेडकर, किशोर केवटे, मनोज गायकवाड, हर्षल चव्हाण, संकेत खेडकर, आकाश भुजबळ, सुनील दौंडकर, औंकार केवटे आणि प्रवीण गाडे हे युवक केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड येथे गेलेले होते.

दर्शनासाठी जाताना त्यांनी तेथे राहण्यासाठी हॉटेलचे रुम बुक केल्या होत्या. त्यासाठी युवकांनी हॉटेल मालकाला 12 हजार रुपये पाठवले होते. सर्व युवक केदारनाथ येथे पोहोचल्यानंतर हॉटेल मालक युवकांचा फोन घेत नव्हता, तसेच युवकांना दिलेल्या पत्त्यावर हॉटेल देखील नव्हते. त्यामुळे सर्व युवक हैराण झाले. त्यांनतर दोन तास हॉटेल शोधल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या युवकांनी उत्तराखंडमधील गुप्तकाशी पोलीस चौकीत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांनतर पोलिसांनी या हॉटेल मालकाचा नंबर युवकांकडून घेऊन 12 तासांत हॉटेल मालकाचा शोध घेऊन युवकांची फसवणूक झालेले पैसे त्यांना परत केले. या वेळी पोलिसांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल शिक्रापुरातील युवकांनी उत्तराखंड पोलिसांचे आभार मानले.

हेही वाचा :

Janmashtami 2023 | भगवान श्रीकृष्ण आले होते कोल्हापुरात, काय सांगते करवीर महात्म्य?

Maratha reservation | मराठा आंदोलनावेळी पोलिसांच्या फायरिंगमध्ये तरुणाच्या शरीरात घुसले ११ छर्रे

Back to top button