मराठा आंदोलन पडसाद : खेड तालुक्यात कडकडीत बंद ! | पुढारी

मराठा आंदोलन पडसाद : खेड तालुक्यात कडकडीत बंद !

राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा:  शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चावर जालना येथे पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि ४) खेड तालुका बंदची हाक देण्यात आली होती. त्याला राजगुरूनगर शहरात व्यावसायिकांनी पूर्णपणे बंद पाळून प्रतिसाद मिळाला. मराठा युवकांनी अकरा वाजता शहरातुन निषेध मोर्चा काढला. हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाची सुरुवात झाली.

प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण, आळंदी शहरासह अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनीलबाबा राक्षे, माजी सभापती भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, सतीश राक्षे, अँड अनिल राक्षे, सतीश राक्षे, अँड गणेश सांडभोर, ऍड नीलेश आंधळे, अँड दीपक थिगळे , सुदाम कराळे, शंकर राक्षे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

पुणे : अपघाताच्या तीन घटनांमध्ये तिघे ठार; मृतांमध्ये 15 वर्षांच्या मुलाचाही समावेश

बारामतीनजीक चारचाकीने धडक दिल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

 

Back to top button