पुणे : वर्गणी दिली नाही म्हणून बांबूने मारहाण | पुढारी

पुणे : वर्गणी दिली नाही म्हणून बांबूने मारहाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गणपतीसाठी वर्गणी दिली नाही म्हणून तिघांनी मिळून एकाला लाकडी बांबूने मारहाण केल्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील सेवक वसाहतीमध्ये घडला. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वाल्मिकी (30), प्रतीक मल्हारी (23, रा. दोघे विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (25) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा किशोर तांबोळी (35, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबोळी आणि वाल्मिकी, मल्हारी हे वसाहतीमध्ये राहण्यास आहेत.

वाल्मिकी आणि मल्हारी यांनी फिर्यादीकडे गणपती मंडळासाठी वर्गणीची मागणी केली. या वेळी फिर्यादीने वर्गणी देण्यास नकार दिला. मी मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे फिर्यादीने सांगितले. मात्र, याचा राग आल्याने वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी फिर्यादीला बांबूने मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीच्या हाताच्या कोपराला लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Canada : लग्नाच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात २ ठार, ६ जखमी

जालना घटनेला न्याय मिळेल; देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरंगे पाटलांना चर्चेसाठी बोलावले

Back to top button