Canada : लग्नाच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात २ ठार, ६ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडामधील ओटावा येथील रिसेप्शन स्थळाच्या पार्किंगमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार आणि सहा जण जखमी झाले आहेत. कार्यक्रमस्थळी दोन विवाहसोहळे होत असताना बाहेर गोळीबार झाला. अस उपस्थित लोकांनी माध्यमांना सांगितले. 26 वर्षीय सैद मोहम्मद अली आणि 29 वर्षीय अब्दिशाकूर अब्दी-दाहिर अशी ठार झालेल्या पुरुषांची नावे आहेत. ते दोघेही टोरंटोचे रहीवासी आहेत. (Canada )
आपल्या मित्राला घेण्यासाठी लग्नाला आलेल्या निकोने आपले आडनाव देण्यास नकार देत एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की,” गोळीबार झाला, त्यामुळे हैराण झालेले पाहुणे सुरक्षिततेसाठी धावपळ करत होते. पुढील तपास पोलिस करत आहेत. कॅनडाच्या सरकारच्या म्हणण्यानुसार, अनेक कॅनेडियन शहरांमध्ये अलिकडच्या वर्षांत सशस्त्र हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे. 2009 पासून, देशात हिंसक बंदूक गुन्ह्यांमध्ये 81 टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा
- जालना घटनेला न्याय मिळेल; देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरंगे पाटलांना चर्चेसाठी बोलावले
- खासगी कंपन्यांऐवजी भरती एमपीएससीमार्फतच करावी : स्पर्धा परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाची मागणी
- Tadoba Tiger Reserve : ताडोबाची ऑनलाईन बुकींग एनआयसी शासकिय पोर्टलद्वारे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
- Tadoba Tiger Reserve : ताडोबाची ऑनलाईन बुकींग एनआयसी शासकिय पोर्टलद्वारे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय