‘आमची मुलगी’ संकेतस्थळ चार वर्षांपासून बंद | पुढारी

‘आमची मुलगी’ संकेतस्थळ चार वर्षांपासून बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गर्भलिंगनिदानाबाबत तक्रार करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली. ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (यूएनएफपीए) या संस्थेकडून 2011 मध्ये ही वेबसाइट सुरू केली होती. तांत्रिक अडचणींमुळे ‘आमची मुलगी’ ही वेबसाइट चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे तक्रार कोठे नोंदवायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘यूएनएफपीए’कडून आरोग्य विभागाला आर्थकि साहाय्य मिळत होते. संकेतस्थळाला देण्यात येणारे आर्थिक साहाय्यही 2019 पासून बंद केले गेले.

आरोग्य व कुटुंबकल्याण विभागानेही ही वेबसाइट सुरू राहण्यासाठी निधी दिला नाही. त्यामुळे वेबसाइट बंद पडली. शासनाने मोठ्या दिमाखात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान हाती घेतले. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. असे असताना प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान अनधिकृतपणे होत असल्यास तक्रार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले संकेतस्थळ बंद पडल्याने शासनाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गर्भलिंग निदानाबाबत तक्रार करण्यासाठी 1800-233-4475 ही हेल्पलाइन आहे. त्यावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Rain update : पावसाचे पुन्हा बरसो रे ! याठिकाणी गुरुवारपर्यंत मुसळधार

UP News : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये तीन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू

Back to top button