UP News : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये तीन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरप्रदेश राज्यातील बाराबंकी जवळील फतेहपुर शहरामध्ये तीन मजली इमारत कोसळली. आणि यात 2 जणांचा मृत्यू, तर 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर चार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (UP news) ही घटना आज (दि.४) पहाटे ही घटना घडली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथके मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहेत, असे बाराबंकीचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी सांगितले.
UP News : 2 जणांचा मृत्यू
माहितीनुसार, उत्तरप्रदेश राज्यातील बाराबंकीमधील आज (दि.४) पहाटे तीन वाजता नगर पंचायत कार्यालयासमोरील मोहल्ला काजीपूर वॉर्ड 2 मधील हाशिम यांचे तीन मजली घर पूर्णपणे कोसळले. मजली इमारत कोसळली. यात 2 जणांचा मृत्यू झाला, 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर चार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.बारा जणांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, तर आठ जणांना लखनौला पाठवण्यात आले. ढिगाऱ्यात आणखी तीन-चार जण अडकल्याची शक्यता असल्याने एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यामध्ये हाशिम यांची मुलगी रोशनी (वय 22) आणि हकीमुद्दीन (वय 25) मुलगा इस्लामुद्दीन यांचा मृत्यू झाला. तर हाशिम यांची पत्नी शकीला (वय 55), मुली झैनाब (वय 10), मेहक (वय 12), मुलगा समीर (वय18), सलमान (वय25), सुलतान (वय28), जफरुल हसन (वय35), मुलगा इस्लामुद्दीन आणि त्याची आई उम्म कुलसुम (वय60) )) गंभीर जखमी झाले आहेत.
#WATCH | UP: Rescue operation underway after a building collapsed in Barabanki pic.twitter.com/IVn3v2Zzrw
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 4, 2023