पतीने घरातून हाकलून दिले... तीन दिवस अन्नही नाही ; अखेर तिने घेतला हा निर्णय | पुढारी

पतीने घरातून हाकलून दिले... तीन दिवस अन्नही नाही ; अखेर तिने घेतला हा निर्णय

पुढारी वृत्तसेवा : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना रविवार पेठेत घडली. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर महिला तीन दिवस उपाशी होती. सुलभा सुरेंद्र पुजारी (वय ४२, रा. वैष्णव अपार्टमेंट, रविवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुरेंद्र रवींद्र पुजारी (वय ४२), दीर समीर, सासू रजनी यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलभा यांचा भाऊ रवी वाघे (वय ४४, रा. गणेशनगर, उस्मानाबाद) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा :

पुणे : गणेश मूर्तीच्या किमतीवरून वाद; विक्रेत्याला मारहाण

Pune : सायबर चोरट्याला हरियाणातून बेड्या

Back to top button