मृणाल गांजाळेंमुळे आंबेगाव तालुक्याचे नाव देशात

मृणाल गांजाळेंमुळे आंबेगाव तालुक्याचे नाव देशात

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'राष्ट्रीय शिक्षक' पुरस्कारावर मृणाल गांजाळे-शिंदे यांच्यामुळे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे महाळुंगे जिल्हा परिषद शाळेने आपले नाव कोरले आहे. मृणाल नंदकिशोर गांजाळे-शिंदे यांंच्यामुळे आंबेगाव तालुक्याचे नाव सर्व देशभर झाले आहे. यंदाचा 'राष्ट्रीय शिक्षक' पुरस्कार मिळालेल्या त्या महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत.
मृणाल गांजाळे-शिंदे ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आहेत. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रगतशील बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यंदाच्या वर्षी त्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन'च्या फेलो 2023-24 च्याही मानकरी ठरल्या आहेत.

मृणाल गांजाळे-शिंदे या मूळच्या मंचर येथील राहणार्‍या असून, त्यांचे पती नीलेश शिंदे हेदेखील उच्चशिक्षित आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे ते निर्यातदार आहेत. 2009 पासून मृणाल ह्या शिक्षण देण्याचे काम करीत आहेत.
एका शेतकरी कुटुंबातील मुलीला हा पुरस्कार मिळाल्याने त्यांची विशेष चर्चा आता सुरू झाली आहे. माझ्या पत्नीला हा पुरस्कार मिळाल्याने मला विशेष अभिमान असल्याचे मृणाल यांचे पती मयूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिक्षण आयुक्तांकडून अभिनंदन
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मृणाल गांजाळे-शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. राज्य निवड समितीने गांजाळे-शिंदे यांची सर्वाधिक गुणांनी निवड केली होती. पुरस्कारासाठी शिफारसदेखील केली होती. त्यांच्या या निवडीने आंबेगाव तालुक्याची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. राज्यातून एकमेव शिक्षिकेला हा पुरस्कार जाहीर झाला असल्याने पुण्यासह आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news