मृणाल गांजाळे-शिंदे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

मृणाल गांजाळे-शिंदे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे-शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशात एकूण 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्रातून मृणाल गांजाळे या एकमेव शिक्षिका आहेत. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या
शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी 50 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शिक्षण आयुक्तांकडून अभिनंदन
मृणाल गांजाळे-शिंदे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. तसेच 2023-24 च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलो च्या मानकरीही ठरल्या आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मृणाल गांजळे यांचे अभिनंदन केले. गांजळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड राज्यस्तरीय निवड समितीने केली होती व राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्याबद्दल राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण आयुक्त म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news