बसप्रवासात पावणेचार लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

बसप्रवासात पावणेचार लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी(पुणे) : खासगी बसमध्ये प्रवास करीत असताना महिलेच्या पर्समधून रोकड आणि दागिने, असा तीन लाख 65 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 25) सकाळी सातच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला. याप्रकरणी शंकर अंबादास नरवणे (53, रा. विलासनगर, अमरावती), यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर नरवणे हे कुटुंबीयांना घेऊन अमरावतीवरून खासगी बसने येत होते. दरम्यान, चिंचवड येथे उतरल्यानंतर त्यांना समजले की, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या पर्समधून तीन लाख 20 हजार रुपयांची रोकड आणि 45 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस नाईक सचिन सोनपेटे
करीत आहेत.

हेही वाचा

पिंपरी : लगेच गाडी हवी; ज्यादा पैसे भरा

संगमनेर : गुंजाळवाडी रस्त्याचे काम पाडले बंद!

अहमदनगर : एसपींच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट

Back to top button