

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नात्यातील तरुणाने एका मुलीवर ती अल्पवयीन असताना, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्याचे चित्रीकरण करून फोटो काढले. पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल तीस लाख रुपये उकळले. भीतीपोटी तरुणीने हा प्रकार घरच्यांना सांगितला नव्हता. मात्र, सतत होणार्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे तरुणाच्या घरच्यांनीदेखील पीडित मुलीला धमकावले होते.
याप्रकरणी, मुंढवा पोलिसांनी तरुणासह त्याची आई, वडील आणि मावस बहीण अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 19 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती आणि आरोपी तरुण हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी तरुणाने पीडित युवतीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे फोटो काढून चित्रीकरण केले. हा प्रकार युवतीने तरुणाच्या घरच्यांना सांगितला. मात्र, त्यांनीदेखील याबाबत कोणाला काही सांगितले, तर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणाने परत युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करीत घरातील एफडी मोडून, सोन्याचे दागिने गहाण ठेवून, तसेच ऑनलाईन असे तीस लाख रुपये स्वतःच्या वडिलांच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सतत ब्लॅकमेल करून आरोपी तरुण पैसे मागत असल्याच्या त्रासाला कंटाळून युवतीने ही माहिती आपल्या घरच्यांच्या कानावर घातली.
हेही वाचा :