‘पहिलवानांना विमाकवच द्या’ ; महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांची मागणी | पुढारी

‘पहिलवानांना विमाकवच द्या’ ; महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरापासून गाव-खेड्यापर्यंत कुस्ती खेळली जाते. त्यामध्ये फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, पारंपरिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारांत शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येते. या खेळात जोखीम असून, पहिलवानांचा विमा असणे आवश्यक आहे. तो लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. खेळाडूला झालेली इजा ही किरकोळ स्वरूपातील असेल तर ती दुरुस्त होते.

परंतु, सांध्यामध्ये झालेली इजा ही गंभीर स्वरूप धारण करते आणि खेळाडूच्या एकूण कारकिर्दीत खंड पडून कारकीर्द संपुष्टात येण्याचा धोका असतो. गंभीर इजा दुरुस्तीसाठी कराव्या लागणार्‍या विविध शस्त्रक्रिया-चाचण्या यांचा खर्च आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य घरांतील खेळाडूंना परवडत नाही. त्यामुळे खेळातील आणि विमा कंपनीतील तज्ज्ञांशी चर्चा करून खेळाडूंसाठी दहीहंडी मंडळांच्या धर्तीवर अपघात विमा योजना लागू केली पाहिजे, अशी मागणी बुचडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा :

Maharashtra Politics: पवारांचा मोठा गेम, कदाचित ऑलिम्पिकही असेल : आ. कडू

राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू

Back to top button