'न्यूट्रिटिव्ह स्लाईस' ही विशेष बाब म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला होता. काही दिवसच याचे वाटप विद्यार्थ्यांना केले होते. आता यापुढे शासनाचे काही धोरण असेल तर पुन्हा राबविण्यात येईल. सध्या खिचडीभात, आमटी-भात असाच आहार देण्यात येत आहे.-अंकुश शारंटवार, अधीक्षक,शालेय पोषण आहारमुलांच्या शालेय पोषण आहारातील मिळणारे न्युट्रिटिव्ह स्लाईस मुले आवडीने खात होती. परंतु शासनाने हा आहार बंद करून पुन्हा फक्त आमटी-भात व खिचडी मुलांना देण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी डाळभात मुलांचा रोजचा आहार आहे तो घरातही त्यांना मिळतो. या मुलांना आहारात पोषक अन्न देणे गरजेचे आहे.-सुरेखा गाडयकवाड,पालक