

पिंपरी : चोर्या करणार्या दहा जणांच्या टोळक्यांच्या पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करीत पोलिसांनी 22 गुन्ह्यांची उकल केली. महम्मद मुस्ताक सिद्दिकी (24, रा. लातूर), पांडुरंग बालाजी कांबळे (23, रा. लातूर), तुषार ऊर्फ बाळ्या अशोक माने (24, रा. तळेगाव दाभाडे), अर्जुन संभाजी कदम (25, रा. लातूर), पक्षाल मनोज सोलंकी (23, रा. चिंचवड), मुराद दस्तगीर मुलानी (36, रा. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, त्यांच्या चार साथीदारांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना माहिती मिळाली की, चिखली येथे तोडफोड केलेले संशयित आरोपी चिखली परिसरात येणार आहेत. तसेच, आरोपी हे महिलांच्या अंगावरील दागिने आणि वाहन चोर्यादेखील करीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून मोहम्मद, पांडुरंग, तुषार, अर्जुन आणि त्यांच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. तसेच, चोरीचे दागिने विकणारे आणि विकत घेणारे पक्षाल व मुराद या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्वांकडून चार कोयते, एक तलवार, पाच दुचाकी, सात मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख 92 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या आरोपींनी पिंपरी-चिंचवड शहरासह लातूर जिल्ह्यातदेखील अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. निगडी, चिखली, एमआयडीसी भोसरी, भोसरी, देहूरोड, दिघी, लातूर ग्रामीण आणि एमआयडीसी लातूर पोलिस ठाण्यात चेन चोरीचे तेरा गुन्हे दाखल आहेत. तर, भोसरी, रावेत, देहूरोड, चिखली या पोलिस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. मोबाईल चोरी तसेच तोडफोडीचे देखील काही गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे एकूण 22 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
यांनी केली कामगिरी
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, अंमलदार दीपक खरात, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिष कुडके, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, संदेश देशमुख, उध्दव खेडकर यांनी ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा :