पुणे : तुंबलेल्या चेंबरचे पूजन करून अनोखे आंदोलन | पुढारी

पुणे : तुंबलेल्या चेंबरचे पूजन करून अनोखे आंदोलन

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  धानोरी-लोहगाव रस्त्यावरील जुना जकात नाका येथे महिनाभरापासून चेंबर तुंबल्याने मैलापाणी रस्त्यावरून वाहत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. या चेंबरला हळदी, कुंकू वाहून प्रतीकात्मक पूजन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि सुशांत माने युवा फाउंडेशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेकडून या चेंबरची दुरुस्ती केली नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.

याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. या निषेधार्थ सुशांत माने युवा फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हळदी, कुंकू व फुले वाहून या चेंबरची पूजा करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशांत माने, अर्जुन गरुड, सुभाष काळभोर, नीलेश पवार, शांताराम खांदवे, गणेश खांदवे, अमोल खांदवे, राजू टिंगरे, सुदर्शन भांडवलकर, श्रीमंत राठोड, अशोक कांबळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून कामगाराचा खून

पुणे : शोरूम फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

Back to top button