बिबट्याची कातडी परदेशात नेण्याचा कट पुणे पोलिसांनी उधळला | पुढारी

बिबट्याची कातडी परदेशात नेण्याचा कट पुणे पोलिसांनी उधळला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सातारा येथील जंगलातून बिबट्याची कातडी आणून ती परदेशात मोठ्या किमतीस विक्री करण्याच्या कटाची माहिती पुणे कस्टम विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पुणे कस्टम पथकाने सातारा येथे जाऊन संबंधित संशयिताचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत एका बिबट्याचे कातडे सापडले. अटक करण्यात आलेली व्यक्ती ही डेअरी व्यावसायिक आहे. जंगली प्राण्यांच्या कातड्यांची परदेशात खरेदीदार पाहून विक्री होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती.

त्यानुसार एका बिबट्याच्या कातडीचा दुबईला विक्रीसाठी कट सुरू असल्याची माहिती कस्टम पथकास मिळाली. त्यानुसार त्यांनी या टोळीतील आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यावेळी सातारा येथे एक जण यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सातार्‍यात जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या घरझडतीत एका बिबट्याचे कातडे मिळाल्याने त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या टोळीतील एक साथीदार दुबईला यापूर्वी पसार झाला असून, आणखी सहभागी साथीदारांचा तपास सुरू असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली .

हेही वाचा

पिंपरी : फेर, फुगडीने नागपंचमीचा आनंद द्विगुणित

जगातील सर्वात महागडे नाणे!

डॉ. विजयकुमार गावितांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड

Back to top button