आमच्या घरात मनभेद नसून मतभेद ; खा. सुळे यांचे प्रतिपादन | पुढारी

आमच्या घरात मनभेद नसून मतभेद ; खा. सुळे यांचे प्रतिपादन

देऊळगावराजे : पुढारी वृत्तसेवा : आमच्यात कुठलेही मनभेद नसून मतभेद आहेत. एवढा एक मुद्दा सोडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. साडेचार वर्षे पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे भाव प्रचंड होते, आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जनतेचा पुळका आला आहे. आता भाव कमी करण्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना हमीभाव देऊन अडचणीच्या काळात नेहमी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहू. भाजपने पक्ष फोडले, घरे फोडली, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

त्या देऊळगाव राजे येथे गावभेट दौर्‍याप्रसंगी बोलत होत्या. या वेळी अप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले, सोहेल खान, योगिनी दिवेकर, वर्षा भागवत, स्वाती गिरमकर, अमित गिरमकर, विष्णू सूर्यवंशी, सुभाष नागवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित गिरमकर यांनी केले. चांगदेव गिरमकर यांनी आभार मानले.

महत्त्वाच्या नेत्यांची पाठ
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर खा. सुळे यांच्या गावभेट दौर्‍यात तालुक्यातील कोणते नेते उपस्थित राहणार, याची उत्सुकता होती. परंतु, पहिल्या फळीतील प्रमुख नेते माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी या दौर्‍याकडे पाठ फिरवली. खा. सुळे यांच्या कार्यालयाकडूनही या दौर्‍याविषयी कुठलीही माहिती या नेत्यांना दिली नसल्याचे समजते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या घरातील मतभेदाचे पडसाद मात्र आजच्या गावभेट दौर्‍यात स्पष्ट जाणवत होते.

हेही वाचा :

सोलापूर : तांत्रिक कारणांमुळे तलाठी परीक्षा २ तास उशीरा; तिन्ही सत्रातील नियोजन कोलमडले

Vijayakumar Gavit : मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित

Back to top button