सेालापूर ; पुढारी वृत्तसेवा राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये 115 टीसीएस केंद्रांवर तलाठी भरतीची लेखी परिक्षा घेतली जात आहे. मात्र आज (सोमवार) रोजी वेळा पत्रकानुसार सकाळी 9 वाजता परिक्षेला सुरुवात झाली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर मध्ये बिघाड झाल्याने ही परिक्षा घेण्यास आडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सेामवारी तिन्ही सत्रात होणार्या परिक्षेचे नियोजन कोलमडले आहे. तर याची तातडीने दखल घेवून निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी टीसीएस कंपनीशी संपर्क करुन दोन तास उशीरा पेपर घेण्याचे कळविले आहे. त्यानुसार तीन्ही सत्रातील पेपर आता दोन तास उशीराने होणार आहेत.
ही परिक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र सोमवारी या कंपनीच्या डेटा सेंटर मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे पेपर वेळेत घेण्यास आडचणी निर्माण झाल्या होत्या. हा बिघाड शोधून काढण्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले. त्यानंतर 9 वाजताचा पेपर 11 वाजता सुरु करावा लागला आहे. तशा सक्त सूचना राज्य समन्वयक यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याशी संपर्क करुन कळविले आहे. त्यामुळे सोमवारी होणार्या तलाठी भरतीच्या तिन्ही सत्रातील परिक्षा नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशीराने होणार आहेत. तशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सर्व परिक्षा केंद्रांना कळविल्या आहेत. त्यामुळे सेामवारचा पेपर दोन तास उशीरा पार पडणार आहे.
तांत्रिक बिघाडा संदर्भात टीसीएस कडून दिलगिरी
तलाठी भरती परीक्षेला तांत्रिक अडचणींमुळे 2 तास पेपर उशीरा घेण्यात आला. त्यामुळे कंपनीकडून दिरंगाई झाली. त्याचा मनस्ताप परिक्षार्थींना तसेच यंत्रणेला झाला. त्यामुळे टीसीएस कंपनीच्या राज्य समन्वयकांडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा :