

मंचर : निरगुडसर (ता. आंबेगाव) आरोग्य केंद्रात गोंधळ घालत वैद्यकीय अधिकार्यांना शिवीगाळ करून पैशाची मागणी केल्याचा आरोप ठेवत दोन यू ट्यूबरवर पारगाव पोलिस ठाण्यात रविवारी (दि. 20) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा मोरमारे यांनी तक्रार दिली आहे.निरगुडसर आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. 19) रात्री विलास भोर, संदीप खळे हे यू ट्यूबर आले आणि 'आम्ही पत्रकार आहोत. तुम्ही शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली का झोपवले? त्यांना उपाशीपोटी का ठेवले?' असे म्हणत डॉक्टरांशी वाद घालून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. विलास भोर याने महिलांच्या वॉर्डमध्ये जाऊन त्यांचे चित्रण करून डॉ. मोरमारे यांना 'पाच हजार रुपये द्या, नाहीतर तुमची बातमी यू ट्यूबवर दाखवून तुमची बदनामी करेन,' असे म्हणत खंडणीची मागणी केली.
याप्रकरणी विलास भोर व संदीप खळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही वॉर्डमध्ये गेलो नाही, ओपन स्पेसमध्येच होतो आणि ओपन स्पेसमध्येच माझ्या घरातील पेशंट व इतर पेशंट झोपवले होते. तेथे माझ्या कुटुंबातील इतरही महिला हजर होत्या. माझ्या पत्नीने मीडियामध्ये दवाखान्याच्या एकंदर कामकाजाबाबत बाईट दिल्याने कदाचित ही तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली असावी. पोलिसांनी सखोल चौकशी करावी.
हेही वाचा :