स्क्रॅपपासून साकारली 5 फुटी मिनी लालपरी | पुढारी

स्क्रॅपपासून साकारली 5 फुटी मिनी लालपरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शालेय जीवनात एसटीच्या माध्यमातून सातत्याने होणारा प्रवास… प्रवासादरम्यान एसटीविषयी निर्माण झालेली आवड आणि कालांतराने त्याच आवडीचे मिनी एसटी बस मॉडेल कारागिरात झालेले रूपांतर… असा अनोखा पियूषचा प्रवास. मात्र, आता त्याने पहिल्यांदाच एसटी प्रशासनाच्या मदतीने बसचे खराब झालेले पत्रे, इतर स्क्रॅप साहित्यापासून नुकतीच पाच फूट आकाराची एसटीची मिनी प्रतिकृती साकारली आहे. ‘अकोला व्हाया छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे’ असा फलक असलेली ही मिनी लालपरी पाहून एसटी वर्तुळात पियूषचे खूपच कौतुक होत आहे.

पियूष राऊत हा तरुण मूळचा वाशीम येथील मेडशी गावातील रहिवासी. लहानपणी शालेय जीवनात शाळेत आणि महाविद्यालयात जाण्यासाठी पियूषला दररोज मेडशी ते मालेगाव असा 30 किलोमीटरचा एसटीने प्रवास करावा लागत असे. असा प्रवास करता करता त्याने आर्ट्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि आता पियूष आयटी विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन करीत आहे. लहानपणापासूनच त्याला एसटीच्या छोट्या प्रतिकृती बनविण्याचा छंद होता. त्या छंदातून त्याने ‘फोम’च्या माध्यमातून अनेक छोट्या प्रतिकृती बनवल्या आहेत. त्याने बनविलेल्या बसच्या छोट्या प्रतिकृतींची एसटीच्या वर्तुळात मोठी चर्चा असते. त्यासोबतच एसटीच्या अनेक कार्यालयांमध्ये सुद्धा त्याने ‘फोम’ पासून तयार केलेल्या छोट्या प्रतिकृती पाहायला मिळतात. मात्र, पहिल्यांदाच त्याने एसटी प्रशासनाच्या माध्यमातून पत्र्याची 5 फुटी मिनी लालपरी बस साकारली आहे.

हेही वाचा :

गोवंश तस्करी विरोधात चंद्रपुरात मोठी कारवाई; १४ जणांना अटक

लडाखमध्ये जगातील सर्वात उंचावरील रस्त्याचे काम सुरू

Back to top button