Delhi School : शिक्षकाची सहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण; मुलगा रुग्णालयात दाखल; दिल्लीच्या सरकारी शाळेतील घटना | पुढारी

Delhi School : शिक्षकाची सहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण; मुलगा रुग्णालयात दाखल; दिल्लीच्या सरकारी शाळेतील घटना

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi School : शाळेत एका सहावीच्या विद्यार्थ्याने हिंदीचे पुस्तक आणले नाही म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम माहराण केली आहे. त्यामुळे मुलाची प्रकृती खालावली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. दिल्लीच्या सरकारी शाळेतील ही घटना आहे. अरबाज असे या विद्यार्थ्याचे नाव असून सादूल हसन असे शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी दिल्लीच्या दयालपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थी अरबाजच्या वडील मोहम्मद रमजानी यांनी सांगितले की, त्यांचा 11 वर्षांचा मुलगा अरबाज याला शिक्षकाने बेदम मारहाण केली होती. मात्र, मुलाची प्रकृती 6 ऑगस्टनंतर बिघडली. त्याला दिल्लीतील तेग बहाद्दुर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद रजनी हे मुस्तफाबादचे रहिवासी आहेत. Delhi School

रजनी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी शिक्षकाने हिंदीच्या पुस्तकाबद्दल विचारले. त्यावर विद्यार्थी अरबाजने हिंदीचे पुस्तक शाळेत आणले नसल्याचे कबूल केले. त्यामुळे विद्यार्थी वर्गातून बाहेर जाण्यासाठी जागेवरून उठला. त्यानंतर शिक्षकाने त्याचा मार्ग अडवला, त्याला चापट मारली आणि विद्यार्थ्याचा गळा दाबला. Delhi School

तसेच रजनी यांनी असेही सांगितले की, त्यांचा मुलगा अरबाज स्टेटमेंट देण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाला मारहाण करणाऱ्या शिक्षक सादुल हसनविरुद्ध तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई केली पाहिजे.

दरम्यान, पोलिसांनी तक्रार नोंदवून शिक्षक सादुल हसनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. मात्र, शालेय प्रशासनाकडून अद्याप याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Delhi School

हे ही वाचा :

Back to top button