तळेगाव स्टेशन : वातावरणातील बदलामुळे भातपीक धोक्यात 

तळेगाव स्टेशन : वातावरणातील बदलामुळे भातपीक धोक्यात 
तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या तळेगाव दाभाडे परिसरात कधी उन्ह तर कधी पाऊस असे  वातावरण असल्यामुळे भात, सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. या पिकांवर बुरशीचा रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.  सध्या तळेगाव परिसरात दिवसा कडक उन्ह पडत असून, सायंकाळच्या सुमारास अचानक पाउस पउत आहे. तर, कधी नुसतेच ढग दाटून येत आहेत.  छत्र्या, रेनकोट न घेता घराबाहेर नागरिक पडले कही अचानक पाऊस सुरू होवून धांदल उडते. याचा परिणाम पिकांबरोबरच नागरिकांच्या  आरोग्यावरही होत आहे.

मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा

दरवर्षी ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाउस पडत असतो. यावर्षी पाउस गायब झालेला असल्यामुळे सध्याचे वातावरण पिकांच्या रोगराईस अनुकूल आहे. असेच वातावरण राहिले तर भात, सोयाबीन पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा दिसत आहे. उशिरा लावलेल्या भात पिकास पाण्याची कमतरता भासत आहे. या वातावरणाचा झेंडू, गुलछडी आदींवर परिणाम होणार नसल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले.
कधी उन्ह तर कधी पाऊस असे वातावरण बुरशीच्या रोगास पोषक आहे. यामुळे भात, सोयाबीन आदी पिकांवर बुरशीचा रोग पडण्याची शक्यता आहे. सध्या भात पिकांची परिस्थिती चांगली आहे.
– प्रियंका पाटील, कृषी सहायक प्रभाग नवलाख उंबरे 
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news