पिंपरी : जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव ; नागरिक त्रस्त, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी : जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव ; नागरिक त्रस्त, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : औंध येथे असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या सेवासुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. रुग्णालयात पिंपरी-चिंचवड परिसरासह पुण्याच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालयावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णालयामध्ये सध्या सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयामध्ये सध्या 13 वॉर्ड आणि 1 आपत्कालीन कक्ष आहे. रुग्णालयामध्ये सध्या 3 पाळ्यांमध्ये 110 कर्मचारी काम करत आहेत. स्वच्छता व वॉर्डातील विविध कामांची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. ही कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. येथील स्वच्छतागृहांमध्ये पुरेशी स्वच्छता होत नाही. त्याचप्रमाणे, लिफ्ट, पार्किंगमध्येही अस्वच्छता पाहण्यास मिळते.

सुरक्षारक्षकांची कमी संख्या
रुग्णालयामध्ये रुग्णाचे नातेवाईक आणि कर्मचार्‍यांमध्ये वारंवार वादावादीचे प्रसंग उद्भवतात. अशा परिस्थितीत सुरक्षारक्षकांची गरज आहे. रुग्णालयात सध्या 19 सुरक्षारक्षक असून किमान 27 सुरक्षारक्षकांची गरज आहे.

मोबाईल, इंटरनेट नेटवर्कमध्ये अडथळे
जिल्हा रुग्णालयात मोबाईल नेटवर्क भेटत नसल्याने रुग्णालयात चौकशीसाठी फोन करणार्या रुग्णाच्या नातेवाईकांची गैरसोय होते. त्याचप्रमाणे, येथे इंटरनेट सेवेसाठीदेखील नेटवर्क नसल्याने त्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो. जिल्हा रुग्णालयात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने संदेशाची देवाण-घेवाण करणे कठीण जाते. आपत्कालीन प्रसंगी सुरक्षारक्षकांना एकमेकांशी भेट घेऊनच कार्य पूर्ण करावी लागतात, त्यामुळे सुरक्षारक्षकांची चांगलीच धांदल उडते.

जिल्हा रुग्णालयात सध्या 19 सुरक्षारक्षक नियुक्त केलेले आहेत. प्रत्येक पाळीमध्ये किमान 8 ते 9 सुरक्षारक्षकांची गरज आहे. त्याशिवाय, रुग्णालयातील स्वच्छता व वॉर्डातील अन्य कामांसाठी नियुक्त कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. आणखी 80 कर्मचार्‍यांची गरज आहे. 
             – डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त शल्य चिकित्सक, पुणे जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news