राजगुरुनगर : कॉलेजमधील खुन्नसवरून काढला मित्राचा काटा | पुढारी

राजगुरुनगर : कॉलेजमधील खुन्नसवरून काढला मित्राचा काटा

राजगुरुनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी दिवाळीत कॉलेजमध्ये खुन्नसने पाहिले म्हणून झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाले. स्थापत्य अभियंता असलेल्या मित्राने आयटी इंजिनियरचा डोक्यात दगड घालून तसेच गळ्यावर, पोटात चाकूचे वार करून खून केला. आरोपीने कोणताही ठोस पुरावा सोडला नसताना खेड पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. सौरभ नंदलाल पाटील (रा. राहता, जि. अहमदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर मयूर संदीप दळवी (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबतचे वृत्त असे की, खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाशिक महामार्गावरील खेड घाटात सांडभोरवाडी गावच्या परिसरात 6 ऑगस्टला एक बेवारस कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचे प्रेत आढळले. तपासात त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पथके तयार केली. आरोपीने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. गोपनीय माहितीनुसार खून झालेल्याचे मूळ गाव कोपरगाव येथे कॉलेजमध्ये शिक्षण घेताना घडलेल्या वादग्रस्त घटना पोलिसांना समजल्या. त्यांनी थेट दळवीला ताब्यात घेतले. चौकशीत खुनाचा उलगडा झाला.

मागच्या दिवाळीत सौरभ पाटील व मयूर दळवी यांच्यात भांडण झाले होते. त्यातूनच मयूरने सौरभचा काटा काढला. खेड घाटातील सांडभोरवाडीच्या हद्दीत दोघांनी दारू प्यायले. त्यानंतर मयूरने डोक्यात दगडी घालून तसेच चाकूचे वार करून सौरभचा खून केला.
सौरभ हा हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी करीत होता, तर आरोपी मयूर हा स्थापत्य अभियंता असून, पुण्यात नोकरीच्या शोधात होता. दोघांची भेट झाली व त्याचे पर्यवसान खुनात झाले.

हेही वाचा

मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल : पंतप्रधान मोदी

पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग चारचाकीवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

सोलापूर : पटवर्धन कुरोलीत खून; भर दिवसा बोलेरो गाडी अंगावर घालून चिरडले

Back to top button