पुणे : गणेश मंडळांची आज बैठक

पुणे : गणेश मंडळांची आज बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना पुणे पोलिसांकडूनदेखील तयारी सुरु झाली आहे. गणेश मंडळ, प्रशासन व पुणे पोलिसांनी याची जय्यत तयारी सुरू केली आहे. गुरुवारी (दि.10) सायंकाळी मध्य भागात पोलिस व गणेश मंडळांची बैठक होणार आहे. तत्पूर्वी पोलिस आयुक्तालयात मंडळांची बैठक आयोजिली होती.

मात्र, वेळेअभावी मंडळात नाराजी पसरल्याने अधिकार्‍यांनी नाराज मंडळांची समजूत काढत गुरुवारी लागलीच सर्व मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली. बुधवारी बैठकीला वेळ लागला. तर, 7 मंडळांची बैठकही लांबणीवर गेली. त्यावरून नाराजी व्यक्त केली. पण, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी लागलीच प्रमुखांशी संवाद साधून विश्वासात घेतले. मध्य भागातील दुर्वांकुर हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली आहे. सायंकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे.

बहिष्काराच्या पवित्र्यानंतर समजूतही

बुधवारी पोलिस आयुक्तालयात गणेशोत्सव मंडळ बैठकीत मंडळांनी नाराजी व्यक्त केली. मानाचे सात गणपती मंडळे यांना आधी सकाळी दहा वाजता बोलावल्याने व अन्य मंडळे दुपारी बारा वाजता बोलाविल्याने तसेच बैठक पाऊण वाजताही सुरू न झाल्याने ही नाराजी व्यक्त करण्यात आली. तर काही मंडळांनी वेगवेगळा वेळ बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, वेळीच पोलिस अधिकार्‍यांनी मंडळांची समजूत काढत ही बैठक गुरुवारी आयोजित केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पुन्हा असा भेदभाव नको अशीही आशा मंडळांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news