पुणे : परीक्षांचं वेळापत्रक ठरलं, आता तयारीला लागा!

पुणे : परीक्षांचं वेळापत्रक ठरलं, आता तयारीला लागा!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे पहिल्या सत्रातील परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर, तर दुसर्‍या सत्रातील परीक्षा मार्च/एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संभाव्य वेळापत्रक लक्षात घेऊन तयारीला सुरुवात करावी, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. याचा परिणाम हा दोन वर्षांच्या परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रियेवर झाला.

त्यामुळे हे निकाल उशिराने जाहीर झाले. काही दिवसांपूर्वी संपलेल्या शैक्षणिक वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष वगळता इतर वर्षांचे निकाल जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याचे काम सुरू आहे. सध्या केवळ प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू असून, येत्या काही दिवसांत त्यांचे निकाल प्रसिद्ध होणार आहेत.

त्यातच विद्यापीठांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली असून, इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, बी-फार्म अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत सत्र परीक्षाही वेळेत पूर्ण होऊन, निकालही मुदतीत जाहीर करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून उपाययोजना आखण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या सत्रातील परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर, तर दुसर्‍या सत्रातील परीक्षा मार्च/एप्रिलमध्ये होणार आहे.

विद्यापीठाच्या साधारण 175 अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्याची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. सध्या प्रथम वर्षाच्या परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले आहे. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे पहिल्या सत्रातील परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात, तर दुसर्‍या सत्रातील परीक्षा मार्च/एप्रिलमध्ये होतील.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news