पालेभाज्या सामान्यांच्या आवाक्यात | पुढारी

पालेभाज्या सामान्यांच्या आवाक्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पावसाचा फटका बसल्याने शहरातील भाजी मंडईमध्ये पालेभाज्या महागल्या होत्या; मात्र गेल्या आठवड्यापासून पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत, तर वाटाणा, शेवगा आणि सीमला मिरचीसह गवार या भाज्यांचे दर वधारले आहेत. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये किरकोळ बाजारात कोथिंबीर, पालक, मेथीची जुडी दहा ते पंधरा रूपयास विक्री होत आहे. आले, लसणाचा दर गेल्या आठवड्यापासून 50 रूपयांनी घटला आहे. प्रतिकिलो 150 रूपयांपर्यत दर आहे. तर वाटाणा 200, शेवगा आणि गवारचे दरदेखील वाढले आहेत. तसेच टोमॅटोला अद्यापही प्रतिकिलो 120 ते 130 रूपयांचा दर आहे.

मोशी उपबाजारातील आवक
लसूण 17, आले 35, टोमॅटो 120 ते 130, हिरवी मिरची 124, कोबी 210, कांदा 309, बटाटा 724, भेंडी 84, कारली 48, शेवगा 33 क्विंटलची आवक झाली आहे. घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर आले 80, लसूण 90, हिरवी मिरची 40, कोबी 10 ते 12, टोमॅटो 80, कांदा 8 ते 9, बटाटा 10 ते 12, भेंडी 20 ते 25, मटार 90 ते 100 रूपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 46 हजार 400 गड्डी, फळे 451 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2 हजार 860 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे
किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रति जुडी)
मेथी 10 ते 20
कोथिंबीर 10 ते 20
कांदापात 15
शेपू 15
पुदिना 10
मुळा 10
चुका 10
पालक 15

फळभाज्यांचे ः किलोचे भाव
कांदा 20 ते 25
बटाटा 25 ते 30
आले 140 ते 150
लसूण 150
भेंडी 60
टामॅटो 120 ते 130
सुरती गवार 100 ते 110
गावरान गवार 150 ते 160
दोडका 70
दुधी भोपळा 60
लाल भोपळा 60 ते 70
कारली 50
वांगी 60
भरीताची वांगी 70
तोंडली 50
पडवळ 100
फ्लॉवर 40
कोबी 25 ते 30
लसूण 220
काकडी 30 ते 40
सीमला मिरची 100 ते 110
शेवगा 90 ते 100
हिरवी मिरची 50 ते 60

गवारचे उत्पादन घटले
पावसामुळे गवारचे उत्पादन घटले आहे. 50 ते 60 रूपये प्रतिकिलो विक्री होणार्‍या सुरती गवार भाजीचे दर वाढले आहेत, तर गावरान गवारचेही दर वाढले आहेत.

हेही वाचा :

घरात घुसून वृद्ध महिलेचा खून ; पिंपरी येथील धक्कादायक प्रकार

गुन्हेगारांचा घडा भरला..! नगरचे एसपी राकेश ओला ‘अ‍ॅक्शन मोडवर’

Back to top button