पिंपरी-चिंचवड शहरात डोळे येण्याची साथ वाढली | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात डोळे येण्याची साथ वाढली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डोळे येण्याची साथ वाढली आहे. गेल्या आठवडाभरात डोळ्याच्या साथीचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. महापालिकेच्या अजमेरा कॉलनी येथील नेत्ररुग्णालयात गेल्या आठवड्यात डोळ्याच्या साथीचे दिवसाला 25 ते 30 रुग्ण तपासले जात होते. सध्या दिवसाला 50 ते 60 रुग्ण तपासले जात आहेत. आळंदीमध्ये डोळ्याची साथ आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातही या साथीचे रुग्ण आढळू लागले आहेत. महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयअंतर्गत कार्यरत असलेल्या अजमेरा कॉलनीतील नेत्ररुग्णालयामध्ये डोळ्यांशी संबंधित विविध आजारांचे दररोज 200 रुग्ण तपासण्यासाठी येतात. त्यातील दररोज जवळपास 50 ते 60 रुग्ण हे डोळ्याच्या साथीचे असल्याचे आढळत आहेत.

शहरात अडीच हजारांपेक्षा अधिक रुग्ण
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये गुरुवारी (दि. 4) डोळ्यांच्या साथीचे 2 हजार 457 रुग्णांनी उपचार घेतले, तर शुक्रवारी 2 रुग्णालयांकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त माहितीनुसार 800 जणांनी डोळ्याच्या साथीवर उपचार घेतले. महापालिकेच्या अजमेरा कॉलनीतील नेत्ररुग्णालयात डोळ्याच्या साथीचे गुरुवारी 70, तर शुक्रवारी 50 रुग्ण आढळले आहेत. रुग्णालयात 21 जुलैला केवळ 10 ते 15 रुग्ण आढळले होते. मात्र, सोमवारपासून (31 जुलै) रुग्णसंख्या दररोज चाळीसच्या पुढेच आहे.

मासुळकर कॉलनीतील नेत्ररुग्णालयात डोळे आलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. डोळ्याची साथ पसरू नये, यासाठी विशेष दक्षता म्हणून ही काळजी घेतली जात आहे. सोमवारपासून (दि. 31 जुलै) रुग्णालयात तपासणीसाठी येणार्‍या डोळ्याच्या साथीचे रुग्ण वाढले आहेत. सध्या दिवसाला 50 ते 60 रुग्ण डोळ्याच्या साथीचे रुग्ण आढळत आहेत. गरज पडली तर घरोघरी जाऊन हे रुग्ण तपासले जातील.
– डॉ. रूपाली महेशगौरी, नेत्ररोग विभागप्रमुख, नेत्ररुग्णालय, मासुळकर कॉलनी

हेही वाचा : 

नाशिक : येवल्यातील 33 बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली, 20 कोटी 82 लाखांचा निधी

पुणे जिल्हा परिषद भरती : १००० जागांसाठी आजपासून अर्ज

Back to top button