पुणे : रुबी हॉल स्थानकातून सर्वाधिक मेट्रो प्रवाशांची ये-जा

पुणे : रुबी हॉल स्थानकातून सर्वाधिक मेट्रो प्रवाशांची ये-जा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेट्रोचा दुसरा टप्पा खुला होऊन 2 दिवस झाले आहेत. त्यातील सर्वच स्थानकांवरून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यामधील रुबी हॉल मेट्रो स्थानकावरून प्रवाशांची सर्वाधिक ये-जा होत असल्याची नोंद मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्या वेळी निम्मीच मेट्रो सेवा सुरू झाली होती.

या वेळी पुणेकरांनी सुरुवातीला मेट्रोची सेवा नवीन असल्यामुळे भरभरून प्रतिसाद दिला. नंतर मात्र पहिल्या टप्प्यातील प्रवासी संख्या कमी झाली. मात्र, आता दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे पुणेकरांना थेट पिंपरी ते कोथरूड-शिवाजीनगर- पुणे स्टेशन असा प्रवास करता येत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. आता ही प्रवासी संख्या कमी न होता आणखी वाढतच राहणार आहे.

बुधवारची प्रवासी वाहतूक…

मेट्रो स्थानक प्रवासी संख्या
रुबी हॉल 3,303 (सर्वाधिक प्रवासी संख्या)
शिवाजीनगर 2,824
सिव्हिल कोर्ट 2,552
वनाज 2,413
पीसीएमसी 2,065

गुरुवारची प्रवासी वाहतूक…

मेट्रो स्थानक प्रवासी संख्या
रुबी हॉल 3,361 (सर्वाधिक प्रवासी संख्या)
शिवाजीनगर 2156
सिव्हिल कोर्ट 2,365
वनाज 3,353
पीसीएमसी 2,904

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news