मोदींना पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी | पुढारी

मोदींना पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचा ताफा जाणार्‍या मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोदी यांची गाडी येताच नागरिक शिट्ट्या मारून मोदी… मोदी… घोषणा देत त्यांचे स्वागत करीत होते. मोदी यांचा दौरा असल्याने पोलिसांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता येथे कडेकोट बंदोबस्त ठेवून बांबूंचे बॅरिकेडिंग केले होते. नागरिकांनी शिवाजी रस्ता, शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे मोदी यांचे जोरदार स्वागत केले.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील दर्शन झाल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावर, टिळक रस्त्यासह गोखले रस्त्यावर इमारतीच्या बाल्कनी, टेरेसवरही नागरिकांची मोठी गर्दी होती. मोदी यांची गाडी जवळ आल्यानंतर नागरिक मोबाईलचे कॅमेरे ऑन करून व्हिडिओ किंवा सेल्फी काढत होते. रिमझिम पावसात ‘मोदी… मोदी…’, ‘भारत माता की जय’, वंदे मातरम’ अशा घोषणा
देत होते.

हेही वाचा :

मुंबई : घाटकोपर बेस्ट डेपाेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; चाकरमान्यांना बसणार फटका

Kangana Ranaut vs Javed Akhtar | कंगनाच्या तक्रारीनंतर जावेद अख्तर यांची सत्र न्यायालयात धाव

Back to top button